
Viral Video : एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो? अरूंद फळीवरून गाडीचं थेट समुद्रात विसर्जन
सोशल मीडियावर तऱ्हतऱ्हेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये अपघात, लग्न, डान्स, सीसीटीव्ही फुटेज अशा व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक दुचाकी थेट समुद्राच्या पाण्यात पडल्याचं दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका समुद्रावरील असल्याचं दिसत आहे. एका बोटीमध्ये दुचाकी टाकण्यासाठी काही नागरिक फळीचा वापर करताना दिसत आहे. अरूंद फळीवरून गाडी नेताने सुरूवातील दोन जण आहेत. गाडी फळीच्या मध्यभागी आणल्यानंतर त्यातील एकजण गाडीला सोडतो. त्यामुळे एकजणाच्या हातातून गाडीवरील नियंत्रण सुटते आणि गाडी थेट खाली समुद्राच्या पाण्यात पडते.
दरम्यान, एका व्यक्तीने हात सोडला आणि दुचाकी थेट समुद्राच्या पाण्यात पडल्यामुळे चांगलं नुकसान झालं आहे. तर अरूंद फळीवरून दुचाकी नेण्याचा कॉन्फिडन्स या व्यक्तीमध्ये कुठून येतो अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.