Shahid Afridi Viral Video : आफ्रिदीकडून भारतीय ध्वजाचा अपमान; मांडीवर ठेवून केली ऑटोग्राफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Afridi

Shahid Afridi Viral Video : आफ्रिदीकडून भारतीय ध्वजाचा अपमान; मांडीवर ठेवून केली ऑटोग्राफ

पाकिस्तान आणि भारतामध्ये अनेकदा वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर पाकिस्तानकडून अनेकदा सीमासुरक्षेचं उल्लंघन करून भारतावर भ्याड हल्ला केला जातो. त्यामुळे साहजिकच पाकिस्तान आणि भारतातील नागरिक एकमेकांच्या विरोधात बोलत असतात. पण सध्या पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रीदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शाहीद आफ्रिदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कतार येथील विमानतळावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे एक शर्ट आणि भारतीय ध्वज दिल्यानंतर तो त्यावर सही करताना दिसत आहे. तिरंग्यावर ऑटोग्राफ करून आफ्रिदीने तिरंग्याचा अपमान केला आहे. यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, शाहीद आफ्रिदी हा मोठ्या मनाचा असल्याचं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. पण भारतीय ध्वजावर सही करणे योग्य आहे का? हा भारतीय ध्वजाचा अपमान नाही का? असाही सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर अनेकांनी शाहीद आफ्रिदीला ट्रोल केलं आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.