Video Viral : '100 लग्न करून तलाक देणार'; 26 लग्न केलेल्या पाकिस्तानी व्यक्तीचं वक्तव्य

Pakistan
PakistanSakal

इस्लामाबाद : पाकिस्तान येथील अय्याश या नावाच्या व्यक्तीने १०० लग्न करून सर्वांना तलाक देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्याने माध्यमाला बोलताना हे वक्तव्य केलं असून त्याच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. सध्या या व्यक्तीचे २६ लग्न झाले असून त्याने त्याच्या २२ बायकांना तलाक दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan
स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

दरम्यान, अय्याश या व्यक्तीने आत्तापर्यंत २२ बायकांशी तलाक केला असून त्याला २२ मुलं आहेत. तलाक दिलेल्या प्रत्येक पत्नीला त्याने एक एक घर दिलं आहे. इथून पुढे ज्या मुलींना तलाक दिला जाणार आहे त्या सर्व मुलींना तो घर देणार असल्याचं त्याने माध्यमाला बोलताना सांगितंल आहे. अवघ्या १९ वर्षाच्या मुलींनीसुद्धा त्याच्यासोबत लग्न केलं असल्याची माहिती असून या मुलींना याचं काहीच वाटत नसल्याचं त्या सांगतात.

Pakistan
Viral : या दोन पोरांनी अख्ख्या जगाला वेड्यात काढलंय; Video पाहून डोक्याला हात लावाल

ही माझी आवड आहे. १०० लग्न करणे हे माझं ध्येय आहे. मी माझ्या होणाऱ्या प्रत्येक बायकोला ही गोष्ट आधी सांगतो. त्यामुळे त्या लग्नासाठी तयार होतात. प्रत्येक बायकोला त्यांच्या वाट्याची संपत्ती देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीच अडचण नाही. त्यांचीही माझ्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. असं अय्याश म्हणाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com