पाकिस्तानी तरूणीची मोदी अन् RAW विषयी तक्रार; दिल्ली पोलिसांनी दिलं तोऱ्यात उत्तर | Pakistan News

यो दोघांचेही ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
Pakistan News
Pakistan NewsSakal

सोशल मीडियावर सध्या एका पाकिस्तानी अभिनेत्रीचं ट्वीट व्हायरल झालं असून तिने यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुप्तचर संघटना RAW विषयी तक्रार केली आहे. तिच्या या ट्वीटला दिल्ली पोलिसांनी चांगलच उत्तर दिलं असून यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Pakistan News
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"दिल्ली पोलिसांची ऑनलाइन लिंक कोणाला माहीत आहे का? माझ्या देशात अराजकता आणि दहशतवाद पसरवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय गुप्तचर संस्था असलेल्या RAW विरुद्ध मला तक्रार दाखल करायची आहे. जर भारतीय न्यायालये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुक्त असतील तर मला खात्री आहे की, भारतीय सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल." असं ट्वीट सेहर सिनवारी हिने केलं आहे.

"आम्हाला भीती वाटते की, आम्हाला अजून तरी पाकिस्तानमध्ये अधिकार क्षेत्र नाही. पण, तुमच्या देशात इंटरनेट बंद असताना तुम्ही कसे ट्विट करू शकता हे जाणून घ्यायला आवडेल!" असं प्रत्युत्तर दिल्ली पोलिसांनी दिलं आहे.

दरम्यान, या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले असून पाकिस्तानी अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. तर दिल्ली पोलिसांनीही तिची चांगलीच शाळा घेतल्यामुळे नेटकऱ्यांनी केलेल्या मजेशीर प्रतिक्रिया वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com