Viral Video : बायकोसाठी पाकिस्तानी नवरदेवाने गायलं बॉलीवूड गाणं; प्रेम पाहून लोकं थक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Singing

Viral Video : बायकोसाठी पाकिस्तानी नवरदेवाने गायलं बॉलीवूड गाणं; प्रेम पाहून लोकं थक्क

लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर त्यामध्ये डान्सचे आणि गाण्याचे व्हिडिओ असतात. सध्या पाकिस्तानातील एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानातील एका लग्नात नवरदेवाने आपल्या बायकोसाठी बॉलीवूड गाणं गायलं आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्न समारंभ चालू असल्याचं पाहायला मिळत असून नवरदेव गिटार वाजवत आहे. तर सुभानअल्लाह हे गाणं तो गिटार वाजवता वाजवता गाताना दिसत आहे. तर तो गाणं गात असताना नवरी खूश होऊन त्याच्याकडे पाहत असून इतर पाहुणेही त्याच्याकडे पाहत आहेत.

दरम्यान, हे गाणं सुरू असताना उपस्थिती मुली त्याला दाद देताना दिसत आहे. तर त्यांनाही या नवरदेवाच्या गाण्याची भुरळ पडली आहे. त्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तर ३ लाख ५० हजार लोकांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :Pakistanbrideviral video