
Death Mystery: 'मी स्वत:ला माझ्या प्रेताजवळ पाहिलं ' मेडिकली डेड घोषित केलेल्या व्यक्तींचे हैराण करणारे अनुभव
Death Mystery : मृत्यूनंतर काय होते? असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडतो का? स्पष्ट आणि अचूक उत्तर तुम्हाला शास्त्रवचनांतून मिळू शकते. 18 पुराणांपैकी सर्वात प्रमुख गरुड पुराणात जीवन आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या स्थितीचे वर्णन आहे.
परंतु जे लोक धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना मिथक आणि मनोरंजनाचे साधन मानतात आणि वैज्ञानिक तथ्यांचा पुरस्कार करतात ते या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना काही पुरावे मिळेपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत त्यांना पोहोचायचे नसते.
आणि याच कारणामुळे शतकांपासून यावर रिसर्च केल्या जातंय विविध शोध घेतले जातेय. मृत्यूनंतर शरीर इथे तर आत्म्याचं नेमकं काय होतं, आत्म्याला भावना असतात काय? मात्र मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि शार्प माइंडेड लोक अजून मृत्यूनंतर शरीरातील आत्म्याचं काय होतं याचा अजून ते शोध लावू शकले नाहीत.

Garud Puran Death Mystery
यासंबंधीचा एक सर्व्हे रेडिट या इंग्रजी वेबसाइटवर चालवला जात आहे, ज्या अंतर्गत वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केल्यानंतर पुन्हा जिवंत झालेल्या लोकांना प्रश्न विचारले जात आहेत.
या सर्व्हेतील लोकांची तीन प्रकारात विभागणी करण्यात आली आहे, ज्यांना 'मृत' झाल्यानंतर काहीच वाटले नाही, जे लोक मेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीशी बोलत होते आणि ज्यांना काहीतरी वेगळे अनुभवले, जसे की प्रकाश पाहिला किंवा इतर काही घटना घडल्या.
एका यूजरने सांगितले की, जेव्हा तो अँजिओग्राफीसाठी गेला होता, तेव्हा काही काळ सर्व काही ठीक चालले होते, परंतु अचानक काही वेळाने डॉक्टर दिसणे बंद झाले.
तो म्हणाला, "मी ज्या खोलीत पडलो होतो ती खोली अचानक अंधारली. मला माझ्या आजूबाजूला कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. आतही एक समाधान होतं, कसलीही हालचाल नव्हती, ताण नव्हता.
अचानक असं वाटलं की कोणीतरी माझा हात धरून मला कुठेतरी जाण्यासाठी तयार केलं आहे. पण मी हात उचलताच माझ्या हाताला जोराचा झटका बसला आणि मग अचानक तिथून डॉक्टरांचा आवाज येऊ लागला "आम्ही वाचलो आहोत".
वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केल्यानंतर पुन्हा जिवंत होणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. एका यूजरने लिहिले "मी माझ्या वर्गात शिकवत होतो की अचानक मला माझ्या हृदयात वेदना जाणवल्या आणि काही वेळात मला एक विचित्र शांतता जाणवली. आजूबाजूला अंधाराशिवाय काहीही नव्हते, मला समजले नाही की माझे विद्यार्थी कुठे गेलेत.
माझ्या चेहऱ्यावर एक प्रकाश पडू लागला तेव्हा सर्व काही चमकल्यासारखे झाले.मी त्या प्रकाशाकडे पडत आहे असे वाटले.अचानक मला आवाज आला आणि मी लगेच माझे डोळे उघडले.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या काळात माझ्या हृदयाने काम करणे बंद केले होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या त्या मित्राचे ३ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याने मला सांगितले की तुला परत जायचे असेल तर तुला प्रयत्न करावे लागतील, नाहीतर तू पण इथेच थांबशील.
मी हार मानली नाही आणि माझ्या शरीरात शिरण्याचा प्रयत्न केला. अचानक मी माझे डोळे उघडले आणि माझी आई माझ्या बाजूला बसलेली दिसली, तिने मला सांगितले की मी जिवंत आहे हा एक चमत्कार आहे.
जगात जितके धर्म आहेत तितक्याच श्रद्धा आहेत. यातील अनेक श्रद्धा आत्म्याच्या स्थितीशी आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाशी संबंधित आहेत. अनेक लोक स्वर्ग आणि नरकाच्या चर्चेवर विश्वास ठेवतात, तर काही या दोघांचे अस्तित्व नाकारतात.