Bihar Crime News: होळीच्या दिवशी झाली आयुष्याची राखरांगोळी; दोन गटाच्या फायरिंगमध्ये गमावला जीव | person standing on the roof died in firing between two groups in Bihar Navgachia video viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firing

Bihar Crime News: होळीच्या दिवशी झाली आयुष्याची राखरांगोळी; दोन गटाच्या फायरिंगमध्ये गमावला जीव

Bihar Crime News : बिहारमध्ये दोन गटाच्या भांडणात एका निष्पाप मुलाच बळी गेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार होळीच्या दरम्यान झाला असून बिहार राज्यातील भागलपूर येथील नौगाचिया येथे ही घटना घडली.

येथील दोन नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी आणि गोळीबार झाला, यामध्ये या तरूणाचा जीव गेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, मृत तरूणाचे नाव आशिष कुमार असं असून तो आपल्या घरासमोर होत असलेल्या भांडणाचा व्हिडिओ काढण्यासाठी टेरेसवर गेला होता. टेरेसवर त्याच्यासोबत आणखी काहीजण होते.

खाली होत असलेल्या भांडणाचा व्हिडिओ शूट करत असताना खालील एका व्यक्तीने गोळीबार केला आणि आशिषला ही गोळी लागली. त्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मृत व्यक्तीच्या भाऊ सचिन याने सांगितलं की, "आमच्या घरासमोल येथील दोन स्थानिक नगरसेवकांचे भांडण चालले होते.

त्यातील काही जणांकडे मोठमोठ्या बंदूका होत्या. आम्ही हे भांडण टेरेसवरून पाहत असताना एकाने गोळीबार केला आणि आशिषला एक गोळी लागली." मृत आशिष हा दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.

टॅग्स :accidentviral video