PM Narendra Modi In Mumbai : पंतप्रधान पडले मुंबईच्या प्रेमात! मोदींनी शुट केलेला Video Viral, नजारा पाहून तुम्हीही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

पंतप्रधान पडले मुंबईच्या प्रेमात! मोदींनी शुट केलेला Video Viral, नजारा पाहून तुम्हीही...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित सेवा आजपासून सुरू होणार आहे. या दरम्यान त्यांनी हेलिकॉप्टरमधून मुंबईचा सुंदर नजारा कैद केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन मुंबईचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये मुंबईचा समुद्र आणि शहराचा अद्भूत नजारा कैद करण्यात आला. या व्हिडीच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलंय की "मुंबई प्रेक्षणीय दिसत नाही का! माझ्या भेटीदरम्यान हा व्हिडिओ घेतलाय.

सध्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा असून या व्हि़डीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या आहेत. या व्हिडीओवर लाखो लाईक्स आल्या असून अनेक मजेशीर कमेंट्स आल्या आहे. अनेक लोक हा व्हिडीओ शेअर करत आहे.