
Viral Video : वर्दीतल्या पोलिसांची होळी; कारवाईच्या भितीने महिला कर्मचाऱ्याने तोंड बांधले
कानपूर : देशभरात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. तर अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल. पण ऑन ड्युटीवर असलेल्या पोलिसांना होळी साजरी करता येते का? अनेकदा वर्दीवर डान्स केल्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला आहे. पण सध्या उत्तरप्रदेशमधील पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उत्तरप्रदेशमधील कानपूर येथील काही पोलिसांनी मोठ्या जल्लोषात होळी साजरी केली आहे. या व्हिडिओमध्ये काही महिला आणि पुरूष पोलीस कर्मचारी डान्स करताना दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत काही स्थानिक नागरिकही डान्स करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, डान्स करत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने कारवाईच्या भितीने तोंडाला पट्टी बांधल्याचं दिसत आहे. तर यावर नेटकरी संतापले असून त्यांनाही जीव आहे असं म्हणत या कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आहे. "त्यांना २४ तास ड्युटी करावी लागते, किमान होळीला तरी त्यांना नाचण्याची सूट असावी" अशी अपेक्षा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.