
Viral News : रेल्वे स्टेशनवरच्या टीव्हीवर लागला Porn Video, प्रशासन गोंधळात प्रवासी झाले अवाक
Viral News Patna Station : रेल्वेस्थानकावर हजारो लोक त्यांच्या रेल्वेची वाट बघत उभे असतात. यावेळी तुम्हाला रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेबाबत सुचना देणाऱ्या अनेक घोषणाही ऐकू येत असतील तर दुसरीकडे टीव्ही स्क्रिनवर वेगवेगळ्या जाहिरातीसुद्धा बघायला मिळतील. मात्र बिहारच्या पाटना रेल्वेस्टेशनवर चालू असलेल्या विचित्र जाहिरातीने सगळीकडे खळबळ उडवली आहे. रविवारी टीव्ही स्क्रिनवरील सामान्य जाहिरात बदलून त्याच स्क्रिनवर एका अॅडल्ट मूव्हीची जाहिरात सुरु होती. ही व्हिडीओ क्लिप तब्बल 3 मिनिटांची होती.
ही जाहिरात रविवारी सकाळी सुमारे साडे नऊ वाजताच्या सुमारास स्क्रिनवर सुरु होती. मात्र ही अशी विचित्र जाहीरात बघून प्रवाशांनी वेळ न घालवता लगेच सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडे तक्रार केली.
मात्र जीआरपीने कारवाई करण्यास उशीर केल्यानंतर, आरपीएफने दत्ता कम्युनिकेशनशी संपर्क साधला, स्क्रीनवर जाहिराती चालवण्याची जबाबदारी असलेल्या एजन्सी चालकास महिला, मुले आणि प्रौढां रेल्वेसाठी थांबत असलेल्या पब्लिक प्लेसवरील स्क्रिनवरून ही व्हिडीओ क्लिप आधी थांबवण्यास सांगितले.
नंतर रेल्वे अधिकाऱ्यांनीही कारवाई केली आणि दत्ता कम्युनिकेशनविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. या एजन्सीला रेल्वेने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले असून तिच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. (Patna News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावरील टीव्ही स्क्रीनवर जाहिराती दाखवण्यासाठी एजन्सीला दिलेले कंत्राट रद्द केले आहे. याप्रकरणी रेल्वे विभाग स्वतंत्रपणे चौकशी करत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ खास प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर चालला होता, यावर काही अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा रेल्वे विभागाकडून आता तपास सुरु आहे.