
पुण्यात महिलेच्या गाडीसमोर दादागिरी करणाऱ्या तरूणांना पोलिसांकडून अटक | Video Viral
पुणे : पुण्यातील रस्त्यावर दोन तरूणांनी महिलेच्या गाडीसमोर चांगलीच दादागिरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुचाकी हळू चालवत या महिलेला ओव्हरटेक करण्यापासून या तरूणांनी थांबवलं असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पोलिसांनी या तरूणांना अटक केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण गाडी हळू चालवत चारचाकी गाडीला पुढे जाण्यापासून रोखत होते. सदर महिला आपल्या पती आणि बाळासोबत हा प्रवास करत होती. मुद्दाम हळू दुचाकी चालवत ओव्हरटेक करण्यापासून रोखत असताना गाडी चालक महिलेच्या पतीने या तरूणांचा व्हिडिओ शूट केला होता. यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, पोलिसांनी या तरूणांवर कारवाई करत त्यांच्याकडून दुचाकी ताब्यात घेतली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारचे निर्लज्ज कृत्य करणाऱ्या कोणालाही आम्ही सोडणार नाही असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.