Video Viral: हडपसर अपघाताचा थरारक व्हिडिओ आला समोर; 3 रिक्षांचा चुराडा

Viral
ViralSakal

पुणे : आज (गुरूवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्यातील हडपसर भागात टँकर आणि रिक्षाचालकाचा अपघात झाला. यावेळी रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा व्हिडिओ सध्या शेअर केला जात आहे.

(Pune hadapsar Accident Viral Video)

दरम्यान, हडपसर येथे एका सिमेंट मिक्सर टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो तीन रिक्षांना चिरडत पुढे गेला आणि एका झाडावर आदळून एका रिक्षावर पडला. त्यानंतर रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षाचालक असलेल्या रणजीत माणिक जाधव (रा. मुंढवा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सोलापूर रोडवर दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.

Accident
AccidentSakal

हडपसरमधील रविदर्शन चौक येथे झालेल्या अपघातनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम केले. त्यानंतर काही काळानंतर वाहतूक सुरळित झाली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या अपघातानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accident
AccidentSakal

या अपघातानंतर पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक बच्चूसिंग टाक, प्रशांत सुरसे, सुनील बनकर यांच्यासह आसपासच्या नागरिकांनी बचाव कार्य केले. क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला हटविले असून काही काळासाठी नागरिकांना वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com