
Viral Video : राहुल-प्रियांका यांची धमाल! बर्फातून केली बाईक रायडिंग
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रा संपवून काही दिवसांच्या सुट्टीवर आहेत. ते जम्मू आणि काश्मिर येथील गुलमर्ग येथे आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर सध्या हिमनगावरून बाईक रायडिंग करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी एकाच बाईक वरून बर्फावर बाईक रायडिंग करत आहेत. तर व्हिडिओमध्ये दोघेही खूश दिसत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी अनेक सुरक्षारक्षकांची टीम त्यांच्यासोबत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काही दिवसांपूर्वी संपली. कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा काश्मिरातील श्रीनगर येथे संपली. श्रीनगरमध्ये राहुल गांधी यांचे समारोपाचे भाषण झाले. वरून बर्फाचा पाऊस पडत असताना त्यांनी यावेळी भाषण केले होते. त्यानंतर ते सध्या काही दिवसांच्या सुट्टीवर आहेत.