Video Viral : रेल्वेची धुलाई! लोकलच्या डब्यांसहित प्रवाशांनाही घातली अंघोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video Viral : रेल्वेची धुलाई! लोकलच्या डब्यांसहित प्रवाशांनाही घातली अंघोळ

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रेल्वे धुण्यासाठी एक आगळीवेगळी शक्कल लढवली गेली आहे. तर तुमच्या सेवेसाठी रेल्वे हे काम करत आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी सध्या व्हायरल होत असलेल्या रेल्वेच्या व्हिडिओवर व्यक्त केल्या आहेत. तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरील लोकलचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

(Local Railway Water Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका प्लॅटफॉर्मवर लोकल येत असून प्लॅटफॉर्मवरील एक पाईप तुटल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे त्यातून येणारे पाणी रूळावर पडत आहे. त्यानंतर या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या लोकलवर हे पाणी पडते. त्याचबरोबर लोकल डब्यातील दरवाजाजवळ उभ्या असलेल्या लोकांनाही या पाण्यामुळे अंघोळ घडलीये. तर रेल्वेच्या डब्यावरही पाणी पडल्यामुळे डब्यांनाही अंघोळ घडली आहे.

लोकलचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांकडून मजेशीर प्रतिक्रिया यावर येत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर आता सोशल मीडियावरील व्हिडिओ हे मनोरंजनाचे नवे साधन झाले आहे.