Video: अरे देवा! कुत्र्याचा कारनामा अन् रांगोळीचा शून्य मिनिटात 'खेळखंडोबा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dog

Video: अरे देवा! कुत्र्याचा कारनामा अन् रांगोळीचा शून्य मिनिटात 'खेळखंडोबा'

कधीकधी आपण कितीही चांगलं काम केलं तर काही कारणास्तव क्षणातच मेहनत वाया जाते. असे अनेक प्रकार आपण बघितले असतील. कधीकधी आपलं नशीबंच वाईट असं म्हणून आपण स्वत:लाच दोष देत असतो. तर असाच एका कुत्र्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका छान रांगोळीची नासधूस करत असलेल्या कुत्र्याचा हा व्हिडिओ आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कुत्रा दारात असलेली मोठी रांगोळीची नासधूस करत आहे. ही रांगोळ मोठी असून या रांगोळीला काढायला जवळपास ७० मिनिटे लागले असं सांगण्यात येतंय. प्रतिक पाटील या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर रांगोळी काढायला ७० मिनिटे लागली अन् मोतीने आठ मिनिटात नाश केला असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

तर या नाजूक आणि मोठ्या रांगोळीचा कुत्र्याने एका मिनिटात नाश केलाय. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अशा व्हिडिओमधून आपले मनोरंजन होत असते. तर

टॅग्स :Dogviral video