ना चिलीम, ना धूर पण उंदरांनी फस्त केला चक्क ५८१ किलो गांजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat eat 581 kg ganja

ना चिलीम, ना धूर पण उंदरांनी फस्त केला चक्क ५८१ किलो गांजा

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणाऱ्या असतात. उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे एक वेगळंच प्रकरण समोर आलंय. हे प्रकरण ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

मथुरा पोलिस स्टेशनमध्ये ठेवलेला 581 किलो गांजा चक्क उदरांनी खाल्ला. या विषयी पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितलयं. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. (rats eat 581 kg ganja mathura uttar pradesh police said to the court)

मथुरा पोलिसांनी कोर्टमध्ये सादर केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले की पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला 581 किलो गांजा उदरांनी खाल्ला. हा गांजा पोलिसांनी दोन प्रकरणातून जप्त केला होता. कोर्टात पोलिसांनी सादर केलेल्या या रिपोर्टला वाचून सर्वांनाच धक्का बसला.

शेरगड आणि हायवे पोलिसांनी 2018 मध्ये 386 आणि 195 किलो गांजा जप्त केला होता. यानंतर या गांजाला गोदाममध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी पुराव्यासाठी गांजाचे सॅम्पल कोर्टामध्ये सादर केले होते. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना गांज्याची पुर्ण साठा कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र यावर पोलिसांचे आश्चर्यकारक विधान ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

हेही वाचा: Video Viral : प्रेक्षकातून भावाने 'सोडलं विमान' अन् थेट 'गोल'च झाला

पोलिसांची रिपोर्ट वाचून कोर्टाने त्या या संदर्भात पुरावे सादर करण्यास सांगितले. त्यावर पोलिसांनी कोर्टामध्ये उदरांबाबत हतबलता जाहीर केली. कोर्टाने गोदाममधील उदरांना पळविण्यासाठी पोलिसांना आवश्यक पावले उचलण्यास सांगितले. सोबतच 26 नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणाचे पुरावे कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिलेत.