Sachin Tendulkar Viral : 'या दोघांशिवाय घराला घरपण नाही'; सचिनने शेअर केला हृदयस्पर्शी Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar Viral video

Sachin Tendulkar: 'या दोघांशिवाय घराला घरपण नाही'; सचिनने शेअर केला हृदयस्पर्शी Video

Sachin Tendulkar Viral Video: क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आपल्या घरच्या दोन काळ्या कुत्र्यांसोबतचा हा व्हिडिओ असून त्याने या व्हिडिओर एक हृदयस्पर्शी ओळ लिहिली आहे. तर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो आपल्या दोन कुत्र्यांसोबत खेळताना दिसत आहे. 'या दोघांशिवाय घर, घरासारखं वाटत नाही.' असंही त्याने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. तर तो या दोन कुत्र्यांसोबत बॉल खेळत आहे. कुत्रेही सचिनसोबत खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

दरम्यान, एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या सचिनच्या या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. पाच लाखांपेक्षा जास्त युजर्सने या व्हिडिओला लाईक केलं असून १ हजार ६०० लोकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :DogSachin TendulkarVideo