Saudi Arabia: सौदी अरेबियाच्या मदिना येथे सापडल्या सोने आणि तांब्याच्या खाणी..

सौदी अरेबिया मध्ये प्रामुख्याने कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे आहेत.
Gold and copper mines
Gold and copper minesEsakal

सौदी अरेबिया मध्ये प्रामुख्याने कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे आहेत. आता सौदी अरेबियाच्या सरकारने सोने आणि तांब्याच्या खाणी सापडल्या अशी घोषणा केली आहे. या खाणी अल-मदीना अल-मुनव्वराह परिसरात सापडला आहे. सौदी जिओलॉजिकल सर्व्हेने ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

Gold and copper mines
Gold Smuggling : देशभरात 'गोल्ड रश' कारवाई, फक्त मुंबईतच कोट्यवधींची गोल्ड बिस्कीटं जप्त

मदिना येथे सोने आणि तांब्याच्या खाणी सापडल्या आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मदिना भागातील आबा अल-राहा येथे सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. तर मदिना येथील वाडी अल-फरा येथील अल-मादिकमध्ये तांब्याच्या खाणी सापडल्या आहेत. सौदी जिओलॉजिकल सर्व्हेने ट्विट करून असे सांगितले की, या शोधामुळे जगभरातील लोकांसाठी गुंतवणुकीचे नवीन मार्गही खुले होतील.

Gold and copper mines
Gold-silver Price: सोन्याचे भाव स्थिर तर चांदीच्या दरात तेजी कायम, जाणून घ्या आजचे नवे दर

या खाणीच्या माध्यमातून अंदाजे 4000 लोकांना रोजगार मिळेल.

अल अरेबियाच्या अहवालानुसार, या नवीन शोधामुळे केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापारीही गुंतवणूक करतील. यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. अधिकार्‍यांचा दावा आहे की या शोधामुळे 533 मिलियन गुंतवणूक होईल आणि किमान 4,000 लोकांच्या हाताला काम मिळेल.

सौदी अरेबिया तेलावरील निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी सौदी व्हिजन 2030 तयार करण्यात आले आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या व्हिजन स्थापना केली आहे. मे 2022 मध्ये, राज्याच्या उद्योग आणि खनिज संसाधन मंत्रालयाने खाण क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याबद्दल बोलले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com