स्कूलबस चालवताना ड्रायव्हरला अटॅक; विद्यार्थ्याने... थरारक घटना CCTV मध्ये कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV

स्कूलबस चालवताना ड्रायव्हरला अटॅक; विद्यार्थ्याने... थरारक घटना CCTV मध्ये कैद

कोरोना काळानंतर तरूणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांनी चालता चालता, डान्स करता करता हृदयविकाराचा झटका येण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. तर सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये स्कूल बस चालवणाऱ्या एका ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा स्कूल बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ आहे. त्यामध्ये गाडी चालवता चालवता ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका येतो, हा प्रकार पाठीमागे बसलेल्या एका विद्यार्थ्याच्या लक्षात येतो आणि तो पळत पुढे येतो. त्यानंतर तो स्टेअरिंग पकडून गाडी थांबवतो.

त्याचबरोबर तो त्याच्या छातीवर दाब देण्याचाही प्रयत्न करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, Great Videos या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ आपली झोप उडवेल. सध्या अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :heart attackviral video