
Sagar 143 Punam : मी तुला नाही म्हणाले पण…; शाळेतल्या मुलीचं 'लव्ह लेटर' व्हायरल, चर्चा मात्र मेमरी कार्डची
सध्या इंटरनेट आणि सोशल मीडिया याचा काळ आहे. यामुळे प्रीयकर प्रेयसी यांच्यात होणारा पत्रव्यवहार बंद झाला. आता क्षणभरात व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवला जातो किंवा थेट व्हिडीओ कॉलवर बोलणी होतात. मात्र एक काळ होता जेव्हा जोडपी रोमँटीक पत्र लिहीत असतं. असंच एक जुनं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे व्हायरल होत असलेलं पत्र वाचून एकतर तुम्हाला हसू आवरणार नाही. तर काही जणांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळेल. हे पत्र वाचून काही जणांना त्यांच्या शाळेतील दिवस आठवून जातील.
पूनम नावाच्या एका मुलीने एका सागरसाठी हे पत्र लिहिलं आहे. पत्र वाचून हे एका शाळकरी मुलीनं लिहीलं असल्याचं लक्षात येईल. या पत्रात पुनम ही सागरची समजूत घालताना दिसते आहे. ती लिहिते की, "मी तुला नाही म्हणाले तुला खूप राग आला असेल. पण आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. मी तुला एख विनंती करते शाळेत एकाही मित्राला माहित होऊ देभ नको आणि सर्व मुलांना सांग की पुनमचं आणि माझं काही नाही."
या सोबतच पुनमने सागरसाठी कवीती देखील लिहीली आहे. ज्यामध्ये ती प्रेमाची कबूली देत आहे. तिने लिहीलं की,...
किसी को चांद से मोहोब्बत होती है,
किसी को तारे से मोहोब्बत होती है,
पर मुझे उससे मोहोब्बत है जिसे मै प्यार करती हू,
वह दुसरा कोई नहीं वह तुम हो सागर|
सागर 143 पुनम

शाळेत सर्वांसमोर प्रपोज करणाऱ्या मुलाला तोंडावर नकार दिला. पण मनात तर तो तिलाही आवडतो. अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या पुनमने लिहीलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पत्राचा फोटो शेअर केल्यानंतर त्याखाली कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या पत्रासोबत त्यावर ठेवलेलं एक मेमरी कार्ड देखील दिसत आहे. त्याबद्दल देखील नेटकऱ्यांकडून सागरला प्रश्न विचारले जात आहेत. नेमकं त्या मेमरी कार्डमध्ये आहे तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.