Video : नोरा फतेहच्या गाण्यावर चिमुकल्याचा शाळेतच भन्नाट डान्स; मास्तरही फिदा

Student Dance
Student DanceSakal

लहान मुले काही गोष्टीमध्ये माहीर असतात. त्यांच्या अंगातील गुण लहानपणापासूनच दिसायला लागत असतात. काही गाणे गाण्यात तर काहीजण डान्स करण्यात माहीर असतात. तर सध्या सोशल मीडियावर शाळकरी मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने शाळेच्या एका कार्यक्रमात भन्नाट डान्स केला आहे.

हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा शाळेच्या एका कार्यक्रमात भन्नाट डान्स करत आहे. तो नोरा फतेह हिच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. तर हा डान्स पाहून शाळेतील मास्तरही चकित झाले असतील. शाळेतील शिक्षकानेच हा व्हिडिओ शूट केला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला ४ हजार ५०० लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर युजर्सने त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशळ मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com