Viral Video : मास्तरांनी दिलेला गृहपाठ झाला नाही; पठ्ठ्याने गाडीवरच लिहायला केली सुरूवात

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

आपण लहानपणी शाळेत असताना गृहपाठ केला असेल. अनेक विद्यार्थी गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे मास्तरांचे फटके खायचे. त्यामुळे गृहपाठ पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड असायची. सध्या अशाच एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो स्कुटीवरून शाळेत जात असतानाच गृहपाठ करत आहे.

Viral Video
डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असल्याचं दिसत आहे. तर मागे बसलेला मुलगा सीटवर वही ठेऊन लिहिताना दिसत आहे. तो आपल्या अभ्यासात एवढा मग्न आहे की त्याने वर मान काढून बघायलाही तयार नाही. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com