Viral Video: सील समुद्रातून वर आला स्विमिंग टँकमध्ये पोहला अन्...; पुढे काय झालं पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: सील समुद्रातून वर आला स्विमिंग टँकमध्ये पोहला अन्...; पुढे काय झालं पाहा

एखादा समुद्रातील प्राणी वर येऊन मानवाच्या कृती फॉलो करू लागला तर? आपल्याला विश्वास बसणार नाही पण सील हा समुद्री प्राणी बऱ्यापैकी मानवाच्या कृतीत रूळलेला आपल्याला दिसतो. अशाच एका सील प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची कृती पाहून आपणही चकित व्हाल.

(Seals Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका समुद्रकिनारी एक रेस्टॉरंट आहे. तर एक सील समुद्रातून वर येताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर तो तेथे असलेल्या स्विमिंग टँकमध्ये उडी घेतो. त्यानंतर तो वर येऊन तिथे असलेल्या आराम खुर्चीवर आरामही करताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ अनेक लोकांनी शेअर केला आहे.

सदर सील जेव्हा आरामखुर्चीवर येतो तेव्हा तिथे एक व्यक्ती असतो पण त्याला उठवून हा सील आरामखुर्चीवर कब्जा करतो आणि आराम करतो. या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट येत असून सील हा रेस्टॉरंटमधील सदस्यासारखा कृती करताना आपल्याला दिसत आहे.

टॅग्स :swimmingfishviral video