Viral Video : आपल्या नवजात लहान बहिणीला पाहून चिमुकलीच्या डोळ्यात अश्रू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : आपल्या नवजात लहान बहिणीला पाहून चिमुकलीच्या डोळ्यात अश्रू

लहान मुले निरागस असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीचे मोठे कौतुक असते. सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती आपल्या आईला होणाऱ्या लहान बाळासाठी खूप उत्सुक असते. हा व्हिडिओ पाहून आपणही भावूक व्हाल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आईचा आणि तिच्या लहान मुलीचा आहे. "गुड न्यूज मुव्हमेंट" या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सदर लहान मुलगी आपली आई गरोदर असल्याचं पाहून खूश होत आहे. तर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येताना आपल्याला दिसत आहेत.

दरम्यान, प्रसुतीनंतर ज्यावेळी तिला आपल्या आईच्या दुसऱ्या बाळाला पाहण्याची संधी मिळते त्यावेळी तिच्या डोळ्यातील अश्रूंना ती वाट करून देते. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिची आई भावूक झाल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेल. तर हा व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

टॅग्स :motherTwin sisters