Smriti Irani's Son In Law : कोण आहे स्मृती ईराणींचा जावई? काय करतो, जाणून घ्या सर्वकाही l smriti irani son in law arjun bhalla career job and profile know details | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smruti Irani's Son In Law

Smriti Irani's Son In Law : कोण आहे स्मृती ईराणींचा जावई? काय करतो, जाणून घ्या सर्वकाही

Smruti Irani's Son In Law : नुकताच स्मृती ईराणी यांची मुलगी शैनेल ईराणीचा शाही लग्नसोहळा 9 फेब्रुवारीला पार पडला. नागौरमधील राजस्थानी परिसरात खिमसर किल्ल्यावर शैनेल ईराणी आणि अर्जुन भल्ला यांचं लग्न झालं. वर्ष 2021 मध्ये शैनेल हिचा साखरपुडा NRI अर्जुन भल्लाशी झाला होता. चला तर राजकारणी स्मृती ईराणींचा जावई नेमका कोण आहे, काय करतो याबाबत जाणून घेऊया सविस्तर.

अर्जुन भल्ला हा एक कॅनेडियन लॉयर असून त्याचे आई-वडील भारतीय आहेत. मात्र अर्जुन भल्ला यांचा जन्म कॅनेडात झाला. त्याच्या आईवडिलांसह तो टोरंटो, ओंटारिया कॅनडामध्ये राहातो. अर्जुन भल्लाला एक भाऊसुद्धा आहे ज्याचं नाव अमर भल्ला आहे. त्याच्या आईवडिलांचे नाव सुनील आणि शबिना भल्ला आहे. माहितीनुसार अर्जुन भल्ला हा पशुप्रेमी आहे. त्यांच्याघरी पाळीव प्राणीसुद्धा आहे.

अर्जुन भल्लाचे शिक्षण

अर्जुन भल्लाने त्याचे शालेय शिक्षण कॅनडामधील ओन्टारियोमध्ये सेंट रॉबर्ट कॅथोलिक स्कूलमध्ये पूर्ण केले. 2009 ते 2013 पर्यंत त्यांनी बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. कॅनडाच्या टोरँटोमध्ये सेंट मायकल कॉलेजमध्ये, मानसशास्त्र आणि लॉ सोसायटीमध्ये 2013-2015 पर्यंत त्याने UK त्या लीसेस्टर युनिव्हर्सिटीमधून एलएलबीची डिग्री पूर्ण केली.

2014 मध्ये अर्जुन ब्रेकवॉटर सोल्यूशन्स इंकमध्ये सहभागी झाला. यावर्षी त्याने टेक्निकल एक्सपर्ट म्हणून Apple Inc साठी काम करायला सुरुवात केली आहे. (Smriti Irani)

अर्जुन भल्लाची नेटवर्थ - अर्जुन भल्ला सध्या दुबईमधील संयुक्त अरब अमिरातमध्ये लीगल कंपनीमध्ये कार्यरत आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती जवळपास 400K डॉलर एवढी आहे.