Viral : टेबलाजवळ गेला अन् ड्रॉवरमध्ये निघाला भलामोठा साप; जीवाचा थरकाप

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Snake
SnakeSakal

साप पाहिला की आपली पळता भुई थोडी होते. अनेकजणांना सापाएवढी भिती दुसऱ्या कोणत्या प्राण्याची वाटत नसेल. पण साप प्रत्यक्षात अचानक समोर आला तर विचारूच नका. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका टेबलाच्या ड्रॉवरमध्ये साप सापडला आहे.

Snake
Video Viral : "जळगावच्या मन्या सुर्वे"ची भरचौकात भाईगिरी; शून्य मिनीटात भाईची हवा पोलिसांनी उतरवली

व्हायरल होत असलेला फोटो एका टेबलाच्या कप्प्यातील असून तो फायलीच्या बाजूला गुंडाळी करून बसल्याचं आपल्याला दिसत आहे. अचानक ड्रॉवर उघडल्यावर सदर व्यक्तीने साप पाहिला आणि त्याच्या जीवाचा थरकाप उडाला. हृदयाच्या ठोक्यामध्ये वाढ झाली आणि त्यांनी साप पकडायला सर्पमित्रांना बोलावलं.

दरम्यान, सर्पमित्राने या सापाला पकडून जंगलात सोडून दिले. एका बारच्या मॅनेजरच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये हा साप आढळल्याची माहिती असून असे अनेक प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळे आपणही एखादी वस्तू खूप दिवसांनंतर उघडत असाल किंवा पाहत असाल तर सांभाळून हाताळले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com