Viral Video : घरातून गेला अन् इन्स्पेक्टर होऊन परतला; वर्दीतल्या लेकाला पाहून आईला कोसळलं रडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : घरातून गेला अन् इन्स्पेक्टर होऊन परतला; वर्दीतल्या लेकाला पाहून आईला कोसळलं रडू

प्रत्येक आईवडिलांना आपल्या लेकरांचे ध्येय पूर्ण व्हावे ही इच्छा असते. आपल्या लेकरांनी त्यांचं ध्येय पूर्ण केलं किंवा चांगलं यश संपादन केलं तर त्यांच्यासाठी हा सर्वांत आनंदाचा दिवस असतो. तर मुलांना सरकारी किंवा खासगी नोकरी लागली तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. सध्या अशाच एका आईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या लेकाला वर्दीत पाहून ढसाढसा रडताना दिसत आहे. तर घरातून गेलेल्या लेक थेट पोलीस अधिकारी होऊन आल्यामुले तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून आपणही भावनिक व्हाल. तर मुलानेही आपल्या आईला मिठीत घेतलं आहे. मायलेकरांचं हे प्रेम पाहून डोळ्याप पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, ट्वीटरवरील हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक केलं असून "आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.