Viral Video : शाब्बास मित्रा! आईवडिलांचं पांग फेडलं; मुलाचं यश पाहून आईचे डोळे पाणावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : शाब्बास मित्रा! आईवडिलांचं पांग फेडलं; मुलाचं यश पाहून आईचे डोळे पाणावले

आपल्या मुलाने आपले स्वप्न पूर्ण करावे अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आपल्या मुलाला त्याच्या प्रवासात काही अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक आईवडील प्रयत्नशील असतात. ज्या दिवशी त्याचे स्वप्न पूर्ण होईल तो दिवस आईवडिलांसाठी आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस असतो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण पोलीस अधिकारी झाला असून त्याच्या कार्यक्रमासाठी त्याचे आईवडील उपस्थित आहेत. या कार्यक्रमावेळी त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले असून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान खूप काही सांगून जाते.

दरम्यान, या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या आईच्या डोक्यात टोपी आणि वडिलांच्या हातात बंदूक देत त्यांच्यासोबत फोटो काढला आहे. "शाब्बास मित्रा, आपल्या आईवडिलांचं पांग फेडलं" अशी प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून अनेकांनी व्यक्त केली आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या ध्येयापर्यंतच्या प्रवासात नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.