Viral Video : पायलटमध्ये घुसला एसटी कंडक्टर फेवर; घोषणा ऐकून आवरणार नाही हसू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : पायलटमध्ये घुसला एसटी कंडक्टर फेवर; घोषणा ऐकून आवरणार नाही हसू

आपण अनेकदा एसटी बसने किंवा पुण्यातील पीएमटीने प्रवास केला असेल. बसथांब्यावर किंवा एसटी स्टँडवर अनेक विनोदी लोकं आपल्याला मिळत असतात. पण विनोदी निवेदन करणारे क्वचितंच मिळतात. पुण्यातील पुणे स्टेशन किंवा स्वारगेट बसस्थानकावर सहसा विनोदी निवेदन करणारे पीएमटीचे कर्मचारी आढळून येतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

विशेष म्हणजे व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा विमानातील असून विमानातील एक कर्मचारी आपल्या प्रवाशांना विनोदी पद्धतीने मार्गदर्शन करत आहे. त्याची बोलण्याची विनोदी पद्धत पाहून प्रवाशांनाही हसू आवरत नाही. तर हा व्हिडिओ दिल्ली ते श्रीनगर दरम्यानच्या विमान प्रवास करतानाचा आहे.

दरम्यान, विमान प्रवास करताना काहीजण अस्वस्थ असतात त्यांना हसवण्याचे काम काही कर्मचारी करत असतात. तुम्हीही विमानाने प्रवास केला असेल किंवा भविष्यात करणार असेल. पण असे अनुभवव क्वचितवेळा येत असतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टॅग्स :Comedyviral video