
Viral Video : फिरस्त्या बैलाचा चिमुकल्यावर जोरदार हल्ला; CCTV Footage पाहून झोप उडेल
रस्त्याने जाणारे वळू किंवा प्राणी अनेकदा लहान मुलांवर आणि व्यक्तींवर हल्ला करत असतात. तर या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचे प्रकार आपण पाहिले असतील. पण सध्या एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका लहान मुलावर वळूने जोरदार हल्ला केला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा गल्लीतील रस्त्यावर खेळताना दिसत आहे. तर तेवढ्यात एक वळून पळत येत त्याच्यावर हल्ला करतो. त्याला जोरदार धडक दिल्यानंतर हा चिमुकला खाली पडतो. त्यानंतर वळू त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न करतो.
हा प्रकार पाहून स्थानिक व्यक्ती धावत येतो आणि लहान चिमुकल्याला उचलून घेतो. ही थरारक घटना पाहून आपल्या अंगावर काटा येईल. दरम्यान, आपल्याही अशा लहान चिमुकल्यांची आपण काळजी घेतली पाहिजे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.