CCTV Footage : 'जरा लाजा धरा रे!' चोर आला, फाटकी चप्पल ठेवून चांगला बूट चोरून नेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV Footage

CCTV Footage : 'जरा लाजा धरा रे!' चोर आला, फाटकी चप्पल ठेवून चांगला बूट चोरून नेला

आपल्या आजूबाजूला रोज चोरीच्या कितीतरी घटना घडत असतात. सध्या अशाच एका चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक चोर चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या चोराची चतुराई पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेली घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून एखाद्या दुकानासमोरील ही घटना आहे. दुकानाबाहेर काही लोकांच्या चप्पला आणि बूट सोडलेले आहेत. तर एकजण येतो आणि फोनवर बोलत असल्याचं नाटक करतो. त्यानंतर तिथे असलेला बूट हळूच हाताने ओढून घेतो आणि पायाजवळ ठेवतो.

बूट खाली ठेवल्यानंतर क्षणात तो आपल्या पायातील चप्पल काढतो आणि बूट घालून निघून जातो. या व्हिडिओमध्ये चोराचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपलाही संताप अनावर होईल. कारण अनेकदा आपल्यासुद्धा चप्पल चोरीला गेल्या असतील. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत.

"या धाडसी चोराच्या धाडसी चोरीला सलाम, अरे जरा लाजा धरा रे, काय चोरावं आणि कुठं चोरावं याचं भान तरी ठेवा किमान, नाद खुळा चोरी, आमच्यापण चप्पला अनेकदा अशा प्रकारे चोरी झाल्या आहेत." अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या असून या वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.