
Viral Video : पाकिस्तानात संपली नाही 'पुष्पा'ची क्रेझ; 'ऊ अंटावा'वर भन्नाट डान्स
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. सध्या पाकिस्तानातील दोन तरूणांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...
व्हायरल होत असेलला व्हिडिओ हा पाकिस्तानातील एका लग्नातील आहे. या लग्नात दोन तरूण पुष्पा या चित्रपटातील 'ऊ अंटावा' या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. त्यांच्या डान्सला तिथे उपस्थित असलेले नातेवाईक दाद देताना दिसत आहेत. पाकिस्तानात अजूनही पुष्पा या चित्रपटाची क्रेझ संपली नाही असं या व्हिडिओतून दिसत आहे.
तर सध्या पाकिस्तात आर्थिक मंदी असून अनेक नागरिकांना एकवेळच्या जेवणाची भ्रांत आहे आणि दुसरीकडे असे उत्सव साजरे केले जातात अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.