ट्रॅक्टर चोरी करायला गेला अन् त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला; कसं ते तुम्हीच पाहा | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral VIdeo

Viral Video : ट्रॅक्टर चोरी करायला गेला अन् त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला; कसं ते तुम्हीच पाहा

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये विनोदी, डान्स, लग्न, अपघात, सीसीटीव्ही फुटेज, चोरी अशा प्रकारच्या व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चोर चोरी करत असताना त्याच्या अंगावरून थेट ट्रॅक्टर गेल्याचं दिसत आहे.

ही घटना गुजरातमधील असून ३१ ऑगस्ट च्या मध्यरात्री ही घटना घडली आहे. एक चोर मध्यरात्रीच्या सुमारास तीन चार ट्रॅक्टर उभे असलेल्या एका ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न करतो. तो एक ट्रॅक्टर सुरू करण्याचा प्रयत्न करतो, ट्रॅक्टर सुरू होतो पण ट्रॅक्टर विना ड्रायव्हरचा चालू लागतो. तेवढ्यात त्याच्या पायावर चाक जाते आणि चोर खाली कोसळतो.

दरम्यान, ट्रॅक्टरचे मागचे चाकही चोराच्या अंगावरून जाते पण तरीही तो उठतो आणि पळत जाऊन ट्रॅक्टरवर बसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर चोरी करायला गेलेल्या चोराला या घटनेमुळे चांगलीच चपराक बसली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.