Viral Video : रील बनवणाऱ्या तरूणाला भरधाव ट्रेनने दिली धडक; क्षणात होत्याचं नव्हतं... | थरारक Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : रील बनवणाऱ्या तरूणाला भरधाव ट्रेनने दिली धडक; क्षणात होत्याचं नव्हतं... | थरारक Video

रील बनवण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका तरूणाला ट्रेनची जोराची धडक बसली आहे. यामध्ये हा तरूण गंभीर जखमी झाला असून रील बनवणं त्याला महागात पडलं आहे.

व्हायरल होत असलेल्या रीलमध्ये एक तरूण रेल्वे रूळाच्या अगदी जवळून चालत आहे. तर पाठीमागून भरधाव वेगाने ट्रेन येत असतानाही हा तरूण जवळून चालत आहे. व्हिडिओ काढणारा तरूणही त्याला बाजूला येण्यासाठी सांगत नाही. तोपर्यंत ट्रेनची जोराची धडक या तरूणाला बसते आणि तो खाली पडतो. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या तरूणावर चांगलाच टीकेचा वर्षाव होताना दिसत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.