Viral Video : मुलाची तासंतास टीव्ही बघण्याची खोड आईबाबांनी छानच मोडली; रात्रभर बसवलं टीव्ही बघायला

आपल्या मुलांना टीव्ही पाहण्यापासून कसं वेगळं करावं हा प्रश्न सगळ्याच पालकांना असतो
Trending
Trending sakal

लहान मुलं तासंतास टीव्ही बघणं ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे; त्यात फ्लॅट सिस्टीम मुळे बाहेर खेळायला जाणंही मुलांचं फार कमी झालं आहे. आपल्या मुलांना टीव्ही पाहण्यापासून कसं वेगळं करावं हा प्रश्न सगळ्याच पालकांना असतो; आणि अनेकदा प्रयत्न करूनही मुलांचा टीव्ही सुटत नाही. चीनमधल्या हूनान मधल्या एका आठ वर्षाच्या मुलाला त्याच्या आईबाबांनी छान अद्दल घडवली; जित्याची खोड मोडली हे म्हणायला काही हरकत नाही.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्याचे आईबाबा संध्याकाळी फिरायला गेले होते. त्याला ८.३० ला जेवून होमवर्क करून झोपायला सांगितल होत; हा पठ्ठ्या आईबाबा रात्री उशिरा आले तरी जागाच होता आणि टीव्ही बघत बसला होता. यामुळे ते दोघेही चिडले. ते आल्यावर तो झोपायला जायला निघाला हे बघून त्याच्या आईबाबांनी त्याला परत हॉल मध्ये आणून रात्रभर टीव्ही बघायला लावला. सुरुवातीला त्याला खरोखर मजा येत होती पण हळूहळू त्याला त्रास व्हायला लागला. तो कधी आपण आपल्या खोलीत जाऊन झोपतो असं झाल होत; पण आईबाबांनी त्याला जाऊच दिलं नाही. पहाटे ५ वाजेपर्यंत पालकांनी मुलाला झोपू दिले नाही. चिनी जोडप्याच्या या शिक्षेला खूप प्रतिसाद मिळतो आहे.

Trending
Sheep Viral Video : मेंढ्या अडकल्या चक्रव्ह्यूहात, समोर आलं धक्कादायक कारण

मुलाला धडा शिकवला गेला असेल आणि तो कदाचित काही काळ टीव्ही टाळेल, या घटनेने पालकांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आहे. “मलाही असाच अनुभव आला. आमच्या तीन वर्षांच्या मुलाला KFC चा खूप छंद आहे, तीन दिवस हॅम्बर्गर आणि चिकन खायला घेऊन गेल्यानंतर आता त्याचा उत्साह मावळला आहे,” एका व्यक्तीने सांगितले. तर दुसरा म्हणाला, "शिक्षा खूप कठोर होती, आणि जर मुलाला उशीरापर्यंत झोपण्याची सवय लागली तर?"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com