Viral Video : मस्ती नडली! ट्रीपल सीट गाडी चालवत हवा करणारे शून्य मिनीटात आले जमिनीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : मस्ती नडली! ट्रीपल सीट गाडी चालवत हवा करणारे शून्य मिनीटात आले जमिनीवर

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये अपघात, डान्स, लग्नाच्या, सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तीन जणांचा गाडीवरून अपघात झाला आहे. या तरूणांना आपलीच मस्ती नडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे तरूण नागमोडी पद्धतीने गाडी चालवताना दिसत आहे. सुसाट वेगात नागमोडी, वाकडीतिकडी करून गाडी चालवल्यामुळे चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटते आणि दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळते. त्यानंतर तिघेही दुभाजकावर आदळतात.

दरम्यान, या अपघातामध्ये तिघांनाही दुखापत झाली असून पाठीमागे असलेल्या दुचाकीवरील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. एका गाडीवर तीन जणे बसून आधीच या तरूणांनी वाहतुकीचा नियम मोडला आहे. तर नागमोडी पद्धतीने गाडी चालवण्याची मस्ती या तरूणांना चांगलीच भोवली आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आपल्या कर्माचं फळ आपल्याला शून्य मिनीटात मिळते, मस्ती नडतेच अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :accidentviral video