केकसाठी पैसे नाहीत, शिळ्या भाकरीवरच लावली मेणबत्ती अन्...; चिमुकल्यांचा Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

केकसाठी पैसे नाहीत, शिळ्या भाकरीवरच लावली मेणबत्ती अन्...; चिमुकल्यांचा Video Viral

परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते. अनेकदा आपली परिस्थिती आपल्याला जगायला शिकवते. सध्या लहान दोन चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ते आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्यांच्याकडे केक घ्यायला पैसे नसल्यामुळे ते शिळ्या भाकरीवरच मेणबत्ती लावून वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एक तीन ते चार वर्षाचा मुलगा आणि दोन ते तीन वर्षाची मुलगी या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर मुलाने आपल्या बहिणीसाठी हातात एख भाकरी आणि त्यावर मेणबत्त्या लावलेल्या दिसत आहे.

आपल्या लहान बहिणीसाठी तो "हॅपी बर्थडे टू यू" असं म्हणताना दिसत असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ भारतातली अनेक चिमुकल्यांचं प्रतिनिधीत्व करतो.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :Birthdayviral video