
Viral : देशी AB de Villiersने आणले फिल्डर्सच्या नाकीनऊ; Video पाहून हैराण व्हाल
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे, कधी अपघाताचे तर कधी भयानक दृश्य पाहायला मिळत असतात. पण सध्या एका स्थानिक क्रिकेट टुर्नामेंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये फलंदाजाने क्षेत्ररक्षकांचे नाकीनऊ आणले असून फिल्डर वैतागलेले दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी एका फिल्डरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो चेंडू अडवण्याचा खूप प्रयत्न करूनही चौकार जातो. हा विनोदी व्हिडिओ अनेकांनी शेअर केला होता. पण सध्या ज्या फलंदाजाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या फलंदाजाची फलंदाजी पाहून आपणही हैराण व्हाल.
दरम्यान, व्हिडिओमधील फलंदाज फक्त पाठीमागे चेंडू टोलावताना दिसत असून मागच्या दोन्ही बाजूला क्षेत्ररक्षक उभे करूनही चेंडू सीमारेषेबाहेर जाताना पाहून क्षेत्ररक्षक डोक्याला हात लावून बसले आहेत. "हा तर देशी एबी डीव्हिलियर्स आहे" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.