
Video Viral : इंग्रजी गाण्यावर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्याचा जबरी डान्स; शिक्षिकाही लाजल्या
लहान मुले निरागस असतात. काही लहान मुले खूप छान डान्स करत असतात. आपण शाळेत असताना सांस्कृतीक कार्यक्रमात अनेकदा डान्स केला असेल. सध्या असाच एका विद्यार्थाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो इंग्रजी गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील असल्याचं दिसत आहे. या शाळेच्या ग्राऊंडवर एक मुलगा डान्स करताना दिसत असून बाकीचे विद्यार्थी प्रेक्षक म्हणून बसलेले आहेत. हा डान्स पाहून शाळेतील शिक्षिकाही लाजल्या आहेत. हा डान्स पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.