Viral News : 'आलिशान हॉटेलमध्ये गेला, रुममधून वास येत होता म्हणून बेडखाली पाहिलं अन् बोबडीच वळली'

या घटनेनंतर त्याचं चांगलंच धाबं दणाणलं.
Hotel Bed
Hotel BedSakal

फिरण्याची हौस आपल्यापैकी अनेकांना असते. पण तिथे गेल्यावर असं काही होतं की अनेकांना मोठा शॉक बसतो, आयुष्यच बदलून जातं. काही दिवसांपूर्वी एक पर्यटक आपल्या रुममध्ये झोपलेला असताना, एक सापाची जोडी त्याच्या अंगावर येऊन बसली अन् त्यानंतर त्याची तब्येतच बिघडली. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये राहत असलेल्या झांगला फिरण्याची खूप हौस होती. तो आपल्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर टाकत असले. एकदा तो तिबेटच्या ल्हासा इथं फिरायला गेला होता. त्याने एका आलिशान हॉटेलमध्ये एक रुम बुक केली. जेव्हा तो रुममध्ये गेला, तेव्हा रुममधून कसलातरी विचित्र वास येत होता. पण त्याला वाटलं की हा वास कदाचित आपल्याच पायांचा असेल.

Viral Video : धावत्या दुचाकीवर 2 तरूणींचा रोमान्स; आधी किस नंतर मिठी अन्...

फिरुन थकल्याने झांग तीन तास आपल्या रुममध्ये झोपला होता. त्यानंतर काही वेळासाठी बाहेर निघून गेला. जेव्हा तो जेवण करून परतला, तेव्हा हा वास आणखी तीव्र झाला. तेव्हा त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आपल्याला दुसरी खोली द्यावी अशी विनंती केली. त्याला दुसरी रुम मिळालीही होती, पण काही वेळानंतर हॉटेलच्या स्टाफने सांगितलं की रुम साफ झाली आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिथे जाऊ शकता.(Viral News)

Hotel Bed
Gautami Patil Viral Video: अखेर सापडलाच! गौतमीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकजण ताब्यात...

झांग तिथे गेला अन् अचानक त्याचा ठेच लागून तो पडला. तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या बेडखाली एक प्रेत पडलं होतं. झांगने घडल्या प्रकाराविषयी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. त्यानंतर कळलं की पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपीला आधीच पकडलं होतं. झांगने याबद्दलची सगळी स्टोरी सोशल मीडियावर टाकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com