Viral News : सायकल नव्हे तर, २५ लाखांच्या गाडीतून फिरतं पंक्चर काढणाऱ्याचं पोरगं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

Viral News : सायकल नव्हे तर, २५ लाखांच्या गाडीतून फिरतं पंक्चर काढणाऱ्याचं पोरगं

Youtuber Viral News : सध्या सोशल मीडियावर या मुलाची कहाणी व्हायरल होत आहे. या मुलाचं नाव मनोज डे आहे. त्याचे वडिल सायकल दूरुस्तीचं काम करतात. वडिलांची रोजची कमाई साधारण २५० रुपये होती. ते झोपडीत राहत होते. पण आता मनोजचं नशीब असं काही बदललं आहे की, आता तो २५ लाखाची कार घेऊन फिरत आहे. असं काय घडलं? जाणून घेऊया.

मनोज यूट्यूबर आहे. त्यातून त्याला भरपूर उत्पन्न मिळत आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलचे ३४ लाख सबस्क्रायबर आहेत. तो महिलन्याला लाखो रुपये कमवतो. त्याचे फेसबुकवर सुमारे ४ लाख तर इंस्टाग्रामवर ४ लाख ८५ हजार फॉलोवर्स आहेत.

मनोजचं प्राथमिक शिक्षण एका सरकारी शाळेत झालं. आयटीआय पूर्ण केल्यावर मनोज गुजरातच्या एका फॅक्ट्रीमध्ये कामाला लागला. पण काही दिवसात नोकरी सोडून घरी आला. तो घरी मुलांना ट्यूशन शिकवू लागला आणि एका सायबर कॅफेत कम सुरू केलं.

एक दिवस साबर कॅफेत काम करताना त्याला एक व्हिडीओ दिसला ज्याच्या थंबनेलवर लिहिलं होतं यूट्यूबमधून पैसे कसे कमवावे? तो व्हिडीओ बघून त्यानेपण यातून पैसे कमवण्याचं ठरवलं. त्याला सुरूवातीला तीन वेळा अपयश आलं. त्याने सुरूवातीला गाण्याचं चॅनल सुरू केलं जे चाललं नाही. मग कॉमेडी चॅनेल काढलं. पण तेही चालंलं नाही. मग त्याने टेक चॅनल सुरू केले. त्यावर १००-१५० व्हिडीओ अपलोड केल्यावर मग ८० डॉलरचं उत्पन्न झालं. पण नंतर अचानक त्याच्या जाहिराती बंद झाल्या.

त्यावेळी मनोजला यूट्यूबच्या गाइडलाइंसविषयी फारशी माहिती नव्हती. त्याने माहिती घेतल्यावर त्याला समजलं की, त्याचं जाहिरातींचं अकाउंट कायमचं बंद करण्यात आलं होतं. यामुळे त्याला डिप्रेशन आलं. पण काही महिन्यांनी त्याने नवं चॅनल काढलं.

यावेळी त्याने स्वतःच्या नावाने चॅनल काढलं. त्याच्या जवळ असणाऱ्या साध्या स्मार्टफोनवर शेजाऱ्याच्या जीन्यावर बसून तो व्हिडीओ करायचा. ज्यावेळी यूट्यूबने त्याचं चॅनल मॉनेटाइज केलं त्यावेळी त्याचे ३३ हजार सबस्क्राइबर होते. त्याला पहिल्यांदा यूट्यूबदडून १४ हजार रुपये मिळाले होते.

मग त्याचं चॅनल रॉकेटच्या स्पीडने चालायला लागलं. एका वर्षात त्याची कमाई हजारावरून लाखात पोहचली. यातूनच त्याने २५ लाखाची एक कार खरेदी केली. एक प्लॉट खरेदी केला. तिथं नवं घर बनवत आहे. कुटुंबियांचं राहणीमान पूर्णपणे बदललं. लहानशा घरातून आता ते आलिशान घरात शिफ्ट झाले असून अजून एक नवं घर बनवत आहेत.

जर तुमच्याकडे एक स्मार्टफोन, नॉलेज, पेशंस आणि मेहनतीची तयारी असेल तर कोणीही यूट्यूबमधून आरामात कमाई करू शकतो.

टॅग्स :viralYouTubeviral video