Viral Video : "पूजा जीन्दगी का हवन करवा के चली गई" मजनू चढला विजेच्या तारेवर अन् पुढे… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : "पूजा जीन्दगी का हवन करवा के चली गई" मजनू चढला विजेच्या तारेवर अन् पुढे…

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येणार.

सदर व्हिडीओत एक तरुण प्रेमासाठी चक्क विजेच्या तारेवर चढला आणि पुढे हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसणार.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण विजेच्या तारेवर एकदम टोकावर चढला आहे आणि त्यावर चढून तो प्रेम व्यक्त करतोय. तो जोर जोराने "आय लव्ह यू पूजा" म्हणून ओरडतोय. ज्या विजेच्या खांब्यावर हा तरुण चढला आहे. तो खांबा खूप जास्त उंचावर आहे.

या शिवाय आजुबाजूला धोकादायक तारा देखील आहेत. या तरुणाच्या हातात तुम्हाला मोबाईल दिसत असेल. तो फोनवर ओरडून पूजा ला आपल्या भावना सांगतोय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

हेही वाचा: Viral Video: सोहळा ट्विन्स नातवंडांच्या स्वागताचा पण चर्चा निता अंबानींची! नेटकऱ्यांचं लक्ष होतं ते...

_itz_sonu_beawar या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहलंय "पुजा नाम था उसका जीन्दगी का हवन करवा के चली गई" सध्या या ट्रेंडीग व्हिडीओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. तरी सुद्धा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.