Viral Video : अरेच्च्या! चक्क गाढवावरुन काढली नवरा- नवरीची वरात; Video एकदा पहाच

सदर व्हिडीओमध्ये नवरा नवरीची वरात घोडा किंवा गाडीवरुन काढली नाही तर चक्क गाढवावरुन काढली आहे.
Viral Video
Viral Videosakal

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. लग्नाचेही बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक वरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

सदर व्हिडीओमध्ये नवरा नवरीची वरात घोडा किंवा गाडीवरुन काढली नाही तर चक्क गाढवावरुन काढली आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय झालाय. (Viral Video bride groom entry on donkey shocking wedding video goes viral )

Viral Video
Viral Video : ओव्हरटेक करण्यावरून वाद; नागपुरात महिलेला भररस्त्यात मारहाण

व्हिडीओमध्ये नवरा-नवरी चक्का गाढवावरुन येत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरा नवरी एका गाढवगाडीवर बसले आहेत तर गाढव ही गाडी खेचतो आहे त्यांच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. विशेष म्हणजे गाढवावरून एंट्री करताना नवरा-नवरी खूप उत्साहीत दिसत आहे.

हा व्हिडीओ पाकिस्तान मधील असल्याचा बोलले जात आहे. @pakistan_glitz इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

Viral Video
Social Media Hazards : सोशल मीडियाचे व्यसन धुम्रपानाएवढेच घातक, वेळीच व्हा सावध

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल असून नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेशीर कमेंट करत आहे. पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती ढासळल्याने नवरा नवरीवर गाढवावरुन वरात काढायची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com