हेल्मेटमध्ये शिरला साप! नागराज तर बाहेर यायला तयारच नव्हते, त्यानंतर जे घडलं...|Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : हेल्मेटमध्ये शिरला साप! नागराज तर बाहेर यायला तयारच नव्हते, त्यानंतर जे घडलं...

Snake Inside Helmet Video : वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. वाहतूक पोलीस नागरिकांनी नियमांचे पालन आणि त्याचा आदर राखण्याविषयी नेहमीच सांगत असतात. अशावेळी कुणी त्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दंड करण्यास ते मागेपुढे पाहत नाही. यासगळ्यात महत्वाची कारवाई म्हणजे हेल्मेट सक्तीची. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हेल्मेटसक्ती अनिवार्य करण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं मोठी खळबळ उडाली आहे. त्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हेल्मेटमध्येच साप शिरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या व्यक्तीला तो साप दिसल्यानं त्यानं एका चिमट्यानं तो साप बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो साप काही त्याला दाद देत नव्हता. बऱ्याच वेळच्या प्रयत्नानं तो सापाला हेल्मेटमधून बाहेर काढण्यात यशस्वी झाला आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्या व्यक्तीचं नशीब बलवत्तर म्हणून त्यानं ते हेल्मेट परिधान करण्यापूर्वीच त्याच्या नजरेस ती बाब आली. यापूर्वी देखील अशाप्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले असून कधी पायात परिधान करण्यात येणाऱ्या मौजामध्ये, तर कधी पाठीवरच्या सॅग बॅगमध्ये तर कधी दुचाकीच्या हेडलाईटमध्ये देखील नागराजांनी दर्शन दिल्याचे दिसून आले आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक मात्र नक्की जाणवते की, ज्याठिकाणी हेल्मेट ठेवतो तिथे आजुबाजूला पाहून खात्री करुन घ्यावी की काही धोका तर नाही ना..काही सेकंदाच्या त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीनं अखेर एका चिमट्यानं तो साप बाहेर काढत त्याला सोडून दिले आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला आतापर्यत अकरा लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.