Viral Video : इस्रायलच्या ज्यू व्यक्तीनं गायलं शिवरायांवर मराठी गीत, "अशीच आमुची.. " | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : इस्रायलच्या ज्यू व्यक्तीनं गायलं शिवरायांवर मराठी गीत, "अशीच आमुची.. "

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थरारक असतात. असाच एक चकीत करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. इस्रायलचा ज्यू व्यक्तीचा शिवरायांवर असलेलं मराठी गीत गातानाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral Video of Israel man who sang a marathi song of chhatrapati shivaji maharaj)

सदर व्हिडीओत एक व्यक्ती जे अशीच अमुची आई असती हे शिवरायांवरील गाणं सादर करताना दिसतोय. हा व्यक्ती ज्यू असून इस्त्राईलमधील रहिवासी आहे. तुम्हाला वाटेल इस्त्राईल मध्ये राहणारा व्यक्ती इतक्या छान प्रकारे शिवरायांवरील गाणं कसं काय सादर करतोय. त्यामुळे व्हिडीओ पाहून कोणीही स्तब्ध होणार.

कोण आहे हा व्यक्ती?

इस्त्राईल मध्ये स्थायिक झालेल्या या ज्यू व्यक्तीने पन्नास वर्षांपूर्वी देश सोडला. मात्र त्याची शिवरायांप्रती भक्ती आजही तितकीच कायम आहे. हा व्यक्ती जितक्या सुमधुर आवाजाने गाणं गातोय, हे गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

अशीच अमुची आई असती हे त्याचं गीत प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काही नेटकरी त्यांच्या शिवरायांप्रती प्रेमाचं कौतुक करत आहे. अनेकांना हा व्हिडीओ शेअर केलाय.