
Viral Video : कार मधून नोटांचा पाऊस पाडत आले खरे फर्जी, पोलिसांनी काही तासातच...
Viral Video : रील व्हिडीओ बनवण्यासाठी आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण पिढी काय करून बसतील याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच अतरंगी तरुणांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या तरुणांनी फर्जी सिनेमातील एका सीनची कॉपी करत रील बनवली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. मात्र त्यानंतर जे घडले ते वाचून तुम्हीही चकीत व्हाल.
फर्जी सिनेमातील सीनची कॉपी तरुणांना महागात पडली
शाहीद कपूरच्या फर्जी वेब सीरीजमधला तो सीन तुम्हाला आठवतच असेल. या वेब सीरीजमधील एका सीनमध्ये शाहीद कारमधून रस्त्यावर पैसे फेकत असतो. गुरुग्राममधील तरुणांनी शाहीदच्या वेब सीरीजमधला हा सीन कॉपी करण्याचा प्रयत्न केला. चालत्या कारमधून खोट्या नोटा फेकत या तरुणांनी रील शूट केली. मात्र नोटांचा पाऊस पाडणं या तरुणांना महागात पडलं.
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या काही तासांतच पोलिसांनी या तरुणांना अटक केली. आणि या तरुणांचा शिगेला पोहोचलेल्या अतिउत्साहाचा पार चुराडा झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी काही वेळातच वाऱ्यासारखा व्हायरल झाला. पोलिसांनी मात्र त्यांच्या या चुकीच्या वागण्याची दखल घेत त्यांना ताब्यात घेतले आहे. व्हिडीओमधील तरुण आता पोलिसांच्या अटकेत आहेत.
हल्ली तरुण सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी नको ते स्टंट करत असतात. यातील काही स्टंट्स हे फार विचित्र तर काही जीवघेणे असतात. एकाचं कॉपी करत अनेकजण सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात असा मुर्खपणा करतात. आणि मग कायद्याच्या कचाट्यात अडकतात.
फेमस होण्यासाठी असे काही तुमच्याही मनात येत असेल तर त्याला वेळीच आवर घाला. या तरुणांच्या बाबतीत जे घडले ते तुमच्याही बाततीत घडू शकते. (Viral Video)