
पांढऱ्या रंगाचा कोब्रा कधी पाहिलाय का? व्हिडिओ पाहून झोप उडेल | Viral Video
साप किंवा अजगर म्हटलं की पहिल्यांदा आपल्या अंगावर काटा येत असतो. अनेकदा प्रत्यक्षात साप पाहिला तर आपली झोप उडते. आपण वेगवेगळ्या प्रकारचे साप किंवा नाग पाहिले असतील पण पांढऱ्या रंगाचा नाग आपण कधी पाहिला नसेल. सध्या पांढऱ्या कोब्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पांढरा कोब्रा एका पिशवीतून बाहेर काढला जातो आणि तो क्षणात फणा काढून जंगलात सळसळ करत निघून जातो. पण त्याने काढलेला फणा पाहून अंगावर काटा येतो. सर्पमित्राने त्याला रहिवाशी भागातून पकडून जंगलात सोडून दिलं आहे. कधीकधी जास्त जवळ गेल्यावर साप आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता असते. हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.