Lawyer's Black Coat History: वकील काळाच कोट का घालतात माहितीये? त्यामागे आहे मोठा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lawyer's Black Coat History

Lawyer's Black Coat History: वकील काळाच कोट का घालतात माहितीये? त्यामागे आहे मोठा इतिहास

History Of Wearing Black Coat: न्यायालयाच्या कठळ्यात सवाल करत न्यायासाठी धडपड करणारे वकील कायम काळ्या कोटमध्येच तुम्ही बघितले असतील. मग ते भारतातले असो किंवा विदेशातले. ही परंपरा नेमकी अस्तित्वात आली कुठून याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. मात्र यामागे फॅशन नसून खूप जुना इतिहास आहे. त्यामुळे आजही वकील काळे कोट परिधान करताना दिसतात. त्यामागे नेमके काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया.

का घालतात वकील काळा कोट?

यामागचा इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास 1694 मध्ये राणी मेरीचा मृत्यू कांजण्यांमुळे झाला होता. यानंतर किंग विल्यमसन यांनी राणीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी कोर्टातील सर्व न्यायाधीश आणि वकिलांनी काळे वस्त्र घालावे, असा आदेश दिला होता. दुसरी अशीही मान्यता आहे की, वकिलांसाठी काळ्या पोषाखाचा प्रस्ताव 1637 मध्ये मांडण्यात आला होता. वकील बाकी लोकांपेक्षा वेगळे दिसावे हा त्यामागचा उद्देश होता.

आणखी एक इतिहास असा की इंग्लंडचा राजा चार्ल्स (दुसरा) याच्या मृत्यूच्या दिवशी न्यायाधीश आणि वकील यांना काळा कोट घालण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामागे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे हा रंग सहजासहजी घाण होत नाही. त्यामुळे हा पोषाख दररोज परिधान केला जाऊ शकतो. वकीलांसाठी काळा पोषाख येण्याआधी सुरुवातीच्या काळात सोनेरी लाल कापड आणि तपकिरी रंगाचे कपडे न्यायालयात परिधान केले जायचे.

काळ्या कोटचा ट्रेंड कधी अस्तित्वात आला?

इतिहासानुसार 1327 मध्ये ए़़डवर्डने (III) वकीली सुरू केली. त्यावेळी न्यायाधीशांसाठी वेगळा पोषाख होता. वकील लाल रंगाचे कपडे आणि तपकिरी गाऊन घालायचे. न्यायाधीश पांढरे केस असलेले विग घालायचे. वकिलांच्या पोशाखात बदल 1600 नंतर आला. 1637 मध्ये एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये न्यायाधीशांना लोकांसमोर उभे राहाण्यासाठी काळे पोशाख घालावे लागले. तेव्हापासून वकील पूर्ण लांबीचे गाऊन परिधान करत आहेत.

हेही वाचा: Dance Viral Video : भाभीचा झिंगाट डान्स! म्हणते "मेरे हस्बंड मुझे..."

काळ्या कोटचे महत्व

काळा कोट शिस्त आणि आत्मविश्वासाचे प्रतिक मानले जाते. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक काळा कोट घालतात. आधी ब्रिटीश राजवटीत न्यायाधीश आणि वकील काळा कोट घालत असत, परंतु स्वातंत्र्यानंतर 1965 मध्ये भारतात ते अनिवार्य करण्यात आले.

टॅग्स :CourtLawyeruniform