Viral Video : भररस्त्यात तरूणीसोबत डान्स करत होता नवरा; अचानक गर्दीतून बायको आली अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : भररस्त्यात तरूणीसोबत डान्स करत होता नवरा; अचानक गर्दीतून बायको आली अन्...

आपला पती दुसऱ्या महिलेसोबत डान्स करतो म्हणून एका महिलेने सदर व्यक्तीला भर रस्त्यात मारलेलं आपण कधी ऐकलं नसेल. पण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर एका तोकड्या कपड्यातील महिलेसोबत डान्स करताना दिसत आहे.

आपला पती दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडू नये असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. त्यासाठी त्या योग्य ती काळजी घेत असतात. तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या नवऱ्याला भर गर्दीत मारताना दिसत आहे. व्यक्तीला बायकोने मारलेलं पाहून तेथील लोकांनी चांगलाच जल्लोष केला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.