Sat, June 10, 2023

Viral Video : पुण्यातील रस्त्यावर तरूणांची दादागिरी; महिलेच्या गाडीसमोरच...
Published on : 16 March 2023, 4:26 am
पुणे : पुण्यातील रस्त्यावर दोन तरूणांनी महिलेच्या गाडीसमोर चांगलीच दादागिरी केली आहे. दुचाकी हळू चालवत या महिलेला ओव्हरटेक करण्यापासून या तरूणांनी थांबवलं असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अधिक माहितीनुसार, औंध रावेत BRTS रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. महिला तिच्या पती आणि लहान बाळासोबत प्रवास करत असताना दोन तरूण एका दुचाकीवर वेडीवाकडी गाडी चालवताना दिसत आहेत. एका तरूणाने पिवळा शर्ट घातला असून ते मुद्दाम हळू गाडी चालवतआहेत.
दरम्यान, गाडीतून हॉर्नचा आवाज आल्यानंतरही या तरूणांनी आपल्या गाडीचा वेग कमीच ठेवला. तर महिलेच्या पतीने या तरूणांचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.